Saturday, 20 June 2020

निर्मळता



          निर्मळता....
                   हा शब्द वाचला कि आपल्याला काय आठवत?.......बरोबर आपल्या पृथ्वीतलावर सगळ्यात निर्मळ काय असेल तर ते आहे पाणी...मग ते तलावातील असो,ओढ्यातले असो ,नदीतले किंवा समुद्रातले.....
       एखाद्या ओढ्यातून वाहणारे पाणी वाहताना खूप निर्मळ असते ,पण  काही जनावरे त्यातून  गेल्यामुळे पाणीही गढूळ होते.ओढ्यातली मलीनता पाण्याला मलीन करण्याचा खूप प्रयत्न करत असते.....पण तसं होतं?.....नाही .
काही वेळ पाणी शांतपणे वाहत राहिलं कि ती गढूळता हळूहळू कमी होत जाते आणि कालांतराने नाहीशी होऊन पुन्हा निर्मळ पाणी वाहू लागते........
            आपल्या मनात सुद्धा  असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात.ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलीन करण्याचा प्रयत्न करतात.पण आपण त्यातून सावध राहिले पाहिजे,कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा करावी,जर आपण प्रतीक्षा केली तर मनात कायम स्वच्छ आणि चांगले विचार येतील.क्षणभंगुर भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये..........
                                                                                     लेखन : कावेरी डफळ 

1 comment: