आजच्या संगणक युगात आपण अध्यात्मच विसरून चाललो आहोत.माज्या मते आपल्या उत्पत्तीचे मूळ याच आध्यात्मात सापडतील.अध्यात्म म्हणजे ईश्वरीय सत्यापर्यंत जाण्याचा उत्तम मार्ग....
स्वतः च स्वतःचा शोध घेणे म्हणजे "अध्यात्म".ते आपल्याला स्वतःशी भेट घालून देते. आपल्याला आपली ओळख पटते आणि नकळत आपल्या मनात नेहमी सकारात्मक उर्जा वास करू लागते.जीवन आपोआप सुखमय होत जाते.......खरे सुख कशात आहे हे पडताळून पाहण्याचा मार्ग म्हणजे "अध्यात्म"....पौराणिक भाषेत त्याला आपण मोक्षाचा मार्ग म्हणतो.अध्यात्म जगण्याची कलाच नाही तर जगण्यातले तथ्यही शिकवते.म्हणूनच म्हणतात जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरु होते....कारण विज्ञानाचे ज्ञानही त्या अध्यात्मातूनच स्फुरण पावलेले आहे...
खरं आहे -- विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते :)
ReplyDelete