सदर कथा सत्य घटनेवर आधारित असून त्यात काही काल्पनिक बदल केलेले आहेत.......
मालती आणि किरण दोघेही उच्च शिक्षण घेतलेले विवाहित जोडपं.लग्न झाल्यापासून दोघे खुप प्रेमाने राहात होते.सुरवातीला 3-4 वर्ष काहीच जाणवलं नाहीं मात्र आता लोकही जाता येत सारखं विचारायला लागले होते.
आणि बोलायला ही....
लग्न न झालेली मुलगी आणि मूल न झालेली बाई म्हणजे सगळ्यांसाठी चर्चेचा आणि थट्टेचा विषयचं बनते.मालती आता सगळ्यांना उत्तरं देऊन कंटाळली होती.
सगळे डॉक्टर, देव ,उपास तापास ,देवरूषी सगळं सगळं करून झाल होतं मात्र काहीच उपयोग झाला नाही.
डॉक्टर होईल म्हणत होते पण किती वेळ लागेल ते सांगत नव्हतें.इतर गोष्टी करूनही काहिच फरक पडत नव्हता.
लोकांचं बोलणं आता जास्तच वाढलं .आता तर काही महाविद्वान बायका तर मालतीला वांझोटी म्हणून हिनऊ लागल्या .वांझोटी हा शब्द तिच्या मनाला लाखो इंगल्या डसल्याप्रमाणे वेदना देऊ लागला.ती नेहमीच खूप उदास असायची.लग्नाला आता 14 वर्ष होत आली होती.मालतीने आता पुत्रप्राप्तीची आशा सोडूनच दिली .
असच एकदा तिला काम करताना मध्येच चक्कर आली,तिच्या हातातलं भांड खाली पडलं ती कोसळणार तेवढ्यात तिने कपाटाचा आधार घेतला.भांड्याचा आवाज ऐकून किरण धावत आला.काय झालं त्याला काहीच कळेना.त्याने तिला पकडून सोफ्यावर बसवलं, तिला पाणी दिलं.तिला फार मळमळू लागलं.तीला उलट्या होऊ लागल्या.किरण आता पुरता घाबरला.त्याने तिला धरून धरून गाडीपर्यंत आणलं, गाडीत बसवलं.डॉक्टरांकडे जाऊनच गाडी थांबली.
मालतीला अजूनही खूप थकल्यासारखे वाटत होते.डॉक्टरांनी तिला तपासले,आणि बाहेर येऊन किरणला म्हणाल्या"तुम्हाला आता तिची जास्त काळजी घ्यावी लागेल."
किरण ,"काही घाबरण्याचे कारण तर नाही ना?"
डॉक्अटर ,"अजिबात नाही ,उलट आनंदाच कारण आहे, तुम्ही दोघे आई बाबा होणार आता,अभिनंदन."
किरणला क्षणभर काहीच समजलं नाही.तो पुन्हा एकदा खात्री करतो .डॉक्टर पुन्हा तेच सांगतात ...
त्याला खूप खूप आनंद झाला .डॉक्टरांनी तिला काही प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्या.ते घेऊन दोघे घरीं आले.लगेच वाच्यता नको म्हणून त्यांनी फक्त जवळच्या माणसांना ही गोड बातमी कळवली.....सगळ्यांनाच हि बातमी सुखाचा ओलावा देऊन गेली...
किरण आता जवळ जवळ घरातील सर्व कामे करू लागला .मालतीला फक्त आराम करण्याची सक्त ताकीद दिली होती त्याने.किरणने तिची खूप काळजी घेतली, तिला हवं नको सगळं खाऊ घातलं.
आणि अखेर गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी 2 वाजता मालतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.तिला मिळालेली ही मातृत्वाची देणगी म्हणजे तिला वांझ म्हणणाऱ्याच्या तोंडावर देवाने मारलेली चपराक होती.मालती आणि किरण आता आई बाबा झाले होते.
मोठ्या थाटामाटात त्यांनी बाळाचं बारसं केलं.नाव ठेवले....... आनंद...
त्याच्यामुळे मालती आणि किरणच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारा.... आनंद...
मुळातच नैसर्गिकरित्या बुद्धिमत्ता लाभलेल्या आनंदने दरवर्षी प्रथम क्रमांक काढत आपले 9 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.जसा शाळेत अभ्यासात हुशार तसाच इतर कलांमध्येही पारंगत झाला होता.10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेत तर देशात प्रथम येण्याचा मान त्याला मिळाला.सगळे खूप खुश होते.त्याने सायन्स 11 वि 12 वी करून त्याला इंजिनिअरिंग करायचे होते.तेही परदेशात जाऊन.त्यासाठी तो खूप अभ्यासही करत होता.त्याला स्कॉलरशिप मिळवून परदेशात जायचे होते.स्वतःच्या हिमतीने.त्याचे आई बाबा खूप अभिमानानं त्याचे कौतुक पाहत आणि करत होते.
मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्याने आनंद खूप खुश होता.कॉलेजमध्ये एक प्रोजेक्टचे संमिशन करायचे होते.त्यामुळे तो कॉम्प्युटरवर काम करत बसला होता.नाष्टा झाल्यामुळे, माझं काम झाल्यावरच मी जेवण करिन तोपर्यंत मला डिस्टर्ब करू नको असं त्याने आली सांगितले होते.त्यामुळे आई किचनमधली कामं करू लागली.
आनंद प्रोजेक्ट पूर्ण करत असताना, अचानक त्याच्या डोक्यात कसली तरी कळ निघाली.दोन्हीही हातांनी डोकं धरून तो दाबू लागला.कळ काही कमी होईना ,तो तळमळू लागला, आईला आवाज देऊ लागला पण त्याचा आवाज मोठा येत नव्हता,दरवाजा लावला असल्याने आवाज बाहेरही जात नव्हता.तो खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न करत होता. तत्क्षणी तो खुर्चीवरून खाली कोसळला.तडफडू लागाला......थोडी हालचाल होऊन तो
शां ........त झाला.
दोन तास उलटून गेले तरी आनंद काही बाहेर येईना.म्हणून मालती आता रागावली होती.तिने दरवाजा वाजवून त्याला ,"खूप वेळ झाला, आता आधी जेवण कर, मग उरलेला काम कर"असं बजावलं ...4-5 वेळा दरवाजा वाजऊनही तो काही केल्या दरवाजा उघडत नव्हता त्यामुळे तिला थोडी शंका आली की काहीतरी वेगळं घडतंय...
मालतीने पळत जाऊन किरणला रूममधून बोलावून आणल आनंद दरवाजा उघडत नाही हे समजल्यामुळे तोही दरवाजा वाजवून आनंदला आवाज देऊ लागला.तरीही आतून काहीच हालचाल होईना.... आता मात्र दोघे पुरते घाबरले शेजारच्या 2-3 जणांना त्याने त्वरित बोलावून आणले सगळे प्रयत्न करून झाले .घर 7 व्या मजल्यावर असल्याने खिडकीतून पहाणेही कठीण शेवटी दरवाजा तोडायचा ठरला....
मालतीला आता रडू आवरेना, ती रडायला लागली ,... शेजारच्या बायका तिला धीर देत होत्या....
सगळ्यांनी मिळून दरवाजा तोडला ....समोरच प्रकार पाहून प्रत्येकजण हादरला.आनंद खुर्चीवरून खाली पडलेला होता. त्याचा डोक्याला जखम झाली होती त्यामुळे डोक्यातून रक्त येत होतं.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.सगळ्यांनी त्याला उचलून त्वरित दवाखान्यात हलवले.....
आनंदची ही अवस्था पाहून मालती तर चक्कर येऊनच जमिनीवर कोसळली..तिलाही दवाखान्यात घेऊन गेले.
दवाखान्यात गेल्यावर समजले की आनंद आता या जगात नाही......
मालतीला शुद्ध आली ,ती दचकून उठली आणि आनंद कुठाय मला त्याला पाहायचं?तो बराआहे ना?त्याला काही झालं तर नाही ना? तो शुद्धीवर आला का? मला त्याच्याजवळ घेऊन चला ना?...ती अखंड रडत होती...
तिला तर माहीतही नव्हतं, की तिच्या काळजाचा तुकडा देवाने आता तिच्यापासून कायमचाच तोडून नेला होता...
किरणला तर तिला कस सांगावं तेच कळत नव्हतं..तरीही त्याने तिला आनंदच्या कॉट जवळ आणले... तिथे फक्त एक कॉट होती कोणतीही सुविधा नव्हती , सलाईन ,नळ्या डॉक्टर,कोणतीच उपकरणे नव्हती....
मालती चिडली अशी सेवा देतात का दवाखान्यात ..इथे तर काहीच इलाज चालू नाही.अस का करत आहेत डॉक्टर.आपण त्याला आणखी चांगल्या दवाखान्यात घेऊन जाउ चला,म्हणत मालती आनंद जवळ गेली त्याचा हात हातात घेत बोलू लागली ..तिला त्याचा हात खूप थंड वाटला.....
किरण म्हणाला आता आपण आनंदला परदेशात नेऊनही बर नाही करू शकत ....तो आता झोपलाय कधीच न उठण्यासाठी....आणि तो तोंडावर हात ठेऊन रडू लागला.....
हे शब्द मालतीच्या कानात उकळत तेल ओतल्यासारख्या वेदना देऊन गेलं
"खोटं बोलताय तुम्ही,आनंद मला सोडून कुठेच नाही जाणार.....", मालती रडत किरणवर ओरडत होती...
किरण मालतीचे दोन्ही खांदे हातांनी धरून,"आनंद गेलाय मालती , डॉक्टर म्हणाले त्याला ब्रेन हेमरेंज झाले त्यामुळे तो लगेच जागेवरच गेला...
मालतील तो धक्का सहनच होईना...ती मोठमोठ्याने रडू लागली.देवाचा धावा करू लागली....हवा तर माझा प्राण घे पण माझ्या आनंदला माझ्यापासून हिराऊन घेऊ नकोस...मी नाही जगू शकणार मझ्या आनंदशिवाय .तिच्या आर्त हाकेने काय जादू झाली काहीच कळेना......आनंद अचानक मोठे श्वास घेऊ लागला.डॉक्टर ,नर्स पळत आले सगळ्या मशीन्स जोडून त्याला तातडीने ICUमध्ये हलवले.....काही तासांत आनंद शुद्धीवर आला......
किरण आणि मालतीच्या आयुष्यातला पडद्याआड जाणारा आनंद मालतीने जणू आपल्या ममतेच्या ताकदीने ओढून आणला होता........
काही दिवसांत आनंद पूर्ण बरा होऊन घरी गेला......आणि सातासमुद्रापार जाऊन त्याने त्याच्या आईवडिलांचे आणि त्याचेही नाव सुवर्णाक्षरांनी कोरले .......

This comment has been removed by the author.
ReplyDelete